साडेसोळा लाखांचा साठा जप्त; व्यावसायिकांचे धाबे दणाणले : कारवाई सुरूच राहणार
छत्रपती संभाजीनगर (सांजवार्ता ब्यूरो): अन्न आणि औषध प्रशासनाने मसाला उत्पादन कारखान्यावर धडक कारवाई करत मोठा दणका दिला आहे. अन्न सुरक्षा व मानके कायद्यातील नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी 'मेसर्स ५ स्टार मसाले' या आस्थापनेवर छापा टाकून १६ लाख ४० हजार ९०० रुपये मूल्याचा संशयास्पद अन्नसाठा जप्त करण्यात आला आहे. एफडीएच्या या धडक कारवाईमुळे शहर व परिसरातील भेसळयुक्त व नियमबाह्य अन्नपदार्थ तयार करणाऱ्या व्यावसायिकांचे धाबे दणाणले आहेत. अन्न सुरक्षा अधिकारी पी. एस. कुचेकर यांच्या पथकाने ही कारवाई केली. हा कारखाना गट क्र. २९९पी, गाढे जळगाव येथील जागेवर आहे.
कारवाईच्या वेळी पंच म्हणून संतोष
मारुती भुते हे उपस्थित होते. जप्त करण्यात आलेला सर्व साठा सील करण्यात आला असून तो पुढील आदेशापर्यंत कारखान्याचे
एफबीओ शेख रेहमत शेख फसाद पटेल यांच्या ताब्यात सुरक्षेसाठी देण्यात आला आहे. या साठ्याशी छेडछाड न करण्याचे
कारवाईत जप्त करण्यात आलेला मुद्देमाल
४८८ किलोग्रॅम (१४ युनिट्स) हळद पावडर जप्त केली. ज्याची किंमत २ लाख ४४ हजार रुपये, ७९८ किलोग्रॅम मटण मसाला (१६ युनिट्स) ज्याची किंमत ५ लाख १८ हजार ७०० रुपये आहे. तसेच मिरची पावडर ९१८ किलोग्रॅम (२३ युनिट्स) जप्त केला. ज्याची किंमत ४ लाख ५९ हजार रुपये आहे. तसेच ५९८ किलोग्रॅम (१२ युनिट्स) धने पावडर जप्त केले. ज्याची किंमत २ लाख ३९ हजार २०० रुपये आहे. असे एकूण २ हजार ८०२ किलोग्रॅम साठा जप्त केला. किंमत १६ लाख ४० हजार ९०० रुपये आहे.
निर्देश प्रशासनातर्फे देण्यात आले आहेत. नागरिकांच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्या अशा अन्नपदार्थ उत्पादकांवर अन्न
व औषध प्रशासनाकडून भविष्यातही कारवाई सुरू राहील, असा इशारा सह आयुक्त श्रीकांत करकळे यांनी दिला आहे.
https://epaper.sanjwarta.inv Powered By: Vrudhee Solutions















